Wednesday, 20 January 2010

Gangal1 फॉण्टची वैशीष्ट्ये

Gangal1 फॉण्टची वैशीष्ट्ये
1) ईमेलच्या पहील्या पानावर वापरता येतो.
2) कोणत्याही 'युनीकोड फॉण्ट'पेक्षा वापरायला सोपा आहे.
3) मायक्रोसॉफ्टच्या words, Excel, Pagemaker, Photoshop, . . . वगैरे सर्व ठिकाणी व्यवस्थीत चालतो.
4) केवळ 94 चाव्यात बसवलेला असल्याने दहा बोटांनी जलद लिहीता येते.
5) कोणत्याही संगणकातुन (95, 98, XP, VISTA, . . . ) चालतो.
6) संगणकाचा कितीही व कसाही विकास झाला तरी हा फॉण्ट कालबाह्य ठरणार नाही.
7) फॉण्ट ईमेलने पाठवता येतो कारण यात '*.exe' फाईल्स नसल्याने व्हायरस बाधा होत नाही.
8) संगणकातल्या इतर कोणत्याही सॉफ्टवेअर वा रचनांना कोणताही त्रास होत नाही.
9) याच फॉण्टमधुन मी 'मराठी व्याकरणाची' पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.
10) हा फॉण्ट '*html' मध्येही व्यवस्थितपणे वापरता येतो.
11) 'जसे कागदावर मराठी लिहीता तसे संगणकात फॉण्टने लिहा', अशी सोपी पद्धत यात वापरली आहे.
12) फॉण्टसोबत दिलेल्या 'की-बोर्डच्या' चित्रामुळे तो पटकन आत्मसात करता येतो.
13) हा फॉण्ट मराठीतील सर्व जोडाक्षरे वापरतो.
14) हा फॉण्ट install करायला केवळ एक मीनीट लागते. 'Start' मधील 'Control panel' मध्ये 'font' folder मधे तो 'save' केला की काम झाले!
15) ईमेल मधुन दीला-घेतला जाउन कोणाच्याही संगणकात प्रस्थापीत करता येतो.
16) 'गुगुल'ने दिलेल्या देवनागरी टायपींगपेक्षा तो अतिशय सोपा व अचुक ठरतो. तो 'गुगुल'च्या पहील्या पानावर वापरता येतो, आपण हा फरक जरुर तपासून पहा.
17) मराठीच्या आजच्या सर्व संगणकीय गरजा व्यवस्थितपणे निभावतो.
18) हा फॉण्ट सर्वांसाठी मोफत उपलब्ध केला आहे.
19) 'केवळ, फक्त, नीव्वळ' म्हणजेच १०० % तो मराठी ठरतो.
20) आपण मला ईमेल करा, मी तुम्हाला Gangal1 फॉण्ट मोफत पाठवतो.

No comments:

Post a Comment